Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी बांधून ठेवलेली ११ गोवंशीय जनावरे ताब्यात, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत : कर्जत पोलिसांनी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची होणारी अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सलग

भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी
कुऱ्हाडीने हत्या; चार आरोपी अटकेत  जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली ; २४ तासांत उलगडा
कर्जतमध्ये गोवंश तस्करांवर कारवाई; ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कर्जत : कर्जत पोलिसांनी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची होणारी अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी राशिन येथे छापा टाकून अत्यंत दयनीय अवस्थेत कत्तलीसाठी बांधून ठेवलेली ११ गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे अवैध कत्तल व जनावरांच्या निर्दयी छळाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई प्रदीप बोऱ्हाडे, राजेंद्र थोरात तसेच पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक राशिन परिसरात पेट्रोलिंग करत होते.

यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राशिन येथील बैल बाजाराशेजारील काटवनामध्ये गोवंशीय जनावरे चारापाणी न देता कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना तेथे उन्हात दाव्याने बांधून ठेवलेली ११ गोवंशीय जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. त्यामध्ये जर्सी गायी, खिलारी गाय, गीर जातीच्या गायी तसेच खोंड व वासरांचा समावेश होता. जनावरांना कोणतीही चारापाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना यातना होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली असून त्यांना पुढील पालनपोषण व सुरक्षेसाठी राशिन दूरक्षेत्र येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शाहबाज आयुब कुरेशी (रा. राशिन, ता. कर्जत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात पोलिसांनी अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

COMMENTS