Homeताज्या बातम्या

शेअर्स फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन अर्ज मागे  

शेवगाव : तालुक्यातील नजीकबाभुळगाव येवलेवस्ती येथील बहुचर्चित शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले याने नियमि

पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघटनेने घेतली आमदार लहामटे यांची भेट
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
माहेगाव देशमुख येथून पायी दिंडीचे प्रस्थानमाजी आ. अशोकराव काळे यांनी वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा
शेअर मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय?


शेवगाव : तालुक्यातील नजीकबाभुळगाव येवलेवस्ती येथील बहुचर्चित शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी सखाराम नामदेव ढोरकुले याने नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर करण्यास नापसंती दर्शविल्यानंतर मागे घेतला आहे.
या प्रकरणात शेवगाव येथील रहिवासी अवधूत विनायक केदार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, सखाराम ढोरकुले याने ‘गुरुकृपा ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट’ या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी चालवत असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर १६ टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांनी आरोपीकडे एकूण ३३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपीने ना आश्वासित परतावा दिला, ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली. या संदर्भात १५ डिसेंबर २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास फिर्यादी अवधूत केदार यांनी ऍड. प्रशांत प्रभाकर गिरी यांच्यामार्फत जोरदार विरोध केला. न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे व तपासातील बाबींचा सखोल विचार केला.
 प्रथमदर्शनी आरोपीने खोटी आश्वासने देत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच आरोपीविरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जामीन मंजूर करणे योग्य ठरणार नसल्याचे संकेत न्यायालयाने दिले. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करण्यास नापसंती दर्शविल्यानंतर आरोपी सखाराम ढोरकुले याने आपला जामीन अर्ज मागे घेतला.दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांना सदर खटल्याची सुनावणी प्राधान्याने घेऊन तो लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS