Homeताज्या बातम्या

‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध, आरोपी ताब्यात

श्रीगोंदा : 'ऑपरेशन मुस्कान' अभियानांतर्गत श्रीगोंदा पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे. तिला

कर्जतमध्ये गोवंश तस्करांवर कारवाई; ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी

श्रीगोंदा : ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत श्रीगोंदा पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे. तिला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी २५ मे २०२६ रोजी दुपारी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. शोध घेऊनही ती सापडत नसल्याने चिंतेत पडलेल्या पालकांनी २७ मे २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.

तपासादरम्यान, १५ जून २०२६ रोजी श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाला संबंधित मुलगी पुणे जिल्ह्यातील वेळू परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ वेगाने हालचाली करत वेळू येथून मुलीचा शोध घेतला. या कारवाईदरम्यान स्वप्निल विजय सांगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीला बाल कल्याण समिती (CWC), अहिल्यानगर येथे हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत श्रीगोंदा पोलिसांनी ही दुसरी अल्पवयीन मुलगी शोधून काढली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, महिला पोलीस हवालदार शोभा कुरुळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, राहुल मोढळे आणि शरद चौभे यांच्या पथकाने केली.

COMMENTS