Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात

नांदेड प्रतिनिधी - जिल्यातील धर्माबाद शहरा मधील रमाईनगर येथे अखंड भारतावरच नाही तर संपूर्ण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारे महान राजा चक्रवर्

केबल जळाल्याने. वीजपुरवठा खंडित. संबंधिताच्या दुर्लक्षाने शेतकर्‍यांची पिके करपली
गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर शासन करा
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण

नांदेड प्रतिनिधी – जिल्यातील धर्माबाद शहरा मधील रमाईनगर येथे अखंड भारतावरच नाही तर संपूर्ण आशिया खंडावर राज्य प्रस्थापित करणारे महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2327 वा जन्मोत्सव दिन,जयंतीची सुरुवात रमाईनगर येथील नागरिकांनी  केली आहे.
दि. 29 मार्च रोजी राजा सम्राट अशोक,व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचरंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुनिलचंद्र सोनकांबळे सर इतिहासकार यांच्या हास्ते करण्यात आले आहे.  कार्यक्रमास उपस्थित भा.बौद्ध महा सभा ता.अध्यक्ष सदानंजी देवके,डॉ. कैवारे,प्रा.शिध्दार्थ वाघमारे,अँड.गौतम सोनकांबळे, पोस्ट मॅन गंगाधर कांबळे बेळकोणीकर,आदींचे स्वागत सत्कार पुष्पहार देवुन कार्यक्रमाचे आयोजक सुरेंन्द्र देवके यांनी केले आहे. दुसरे सत्रात सायंकाळी 7:30 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी आभारप्रदर्शन पत्रकार किशन कांबळे यांनी मानले.यावेळी रमाईनगर,साठेनगर येथील नवयुवक,उपा.उपासिका   उपस्थित होते.

COMMENTS