Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीर्घ सेवेनंतर पंचशील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ताडेवाड सेवानिवृत !

हदगाव प्रतिनिधी - येथील पंचशील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष उपमुख्याध्यापक भारत रामचंद्र ताडेवाड हे प्रदीर्घ सेवेनं

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंचे निलंबन
वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला
जालन्यात मराठा आंदोलन चिघळलं

हदगाव प्रतिनिधी – येथील पंचशील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष उपमुख्याध्यापक भारत रामचंद्र ताडेवाड हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले काल शाळेने एका शानदार कार्यक्रमात सरांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला.
सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ग्यानोबाराव वाठोरे,सचिव सुनीलभाऊ सोनुले प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी किशनराव फोल, कोषाध्यक्ष तावडे,संचालिका हदगावकर मॅडम,मुख्याध्यापक गोरे सह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला,भारत रामचंद्र ताडेवाड यांनी शाळेसाठी पूर्णवेळ दिला शाळेच्या सर्वच विकासात त्यांचा मोठा हातभार आहे,आपल्या अध्यापना सोबतच त्यांनी पंचशील विद्यालय परीवाराच्या सुख-दुखात मदतीला धावून जाणे, विद्यार्थ्यांच्या अनंत अडचणी सोडविणे,जखमी विद्यार्थ्यावर प्रथमोपचार करणे यासह आदी कामामुळे ते विद्यार्थी प्रियशिक्षक म्हणून ओळखले जात.हदगाव तहसील व पंचायत समितीकडून येणार्‍या सूचनेचे पालन करून ताडेवाड सर नेहमी सुंदर कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याचे  गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले याप्रसंगी म्हणाले, शाळेचे सहशिक्षक दीपक हूलकाने,श्रीमती चंदापूरे मॅडम,प्रा.गुंडे, मुख्याध्यापक गोरे,काळबांडे,  डोरले,अनिल दस्तूरकर आदींनी सरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. ताडेवाड सरांनी शाळेला पुर्णवेळ दिल्याने मला त्यांची खूप मदत झाली सरांनमुळे शाळेची खूपकाही प्रगती झाली त्यांनी केलेल्या कार्याचा संस्थेला कधीच विसर पडणार नाही असे अध्यक्षीय समारोपात संस्थेचे सचिव सुनीलभाऊ सोनुले म्हणाले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन भाऊराव डोरले सरांनी केले.

COMMENTS