Homeताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर लाखो शिवभक्त उपस्थित राहणार : माधवराव देवसरकर

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज र

महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा
नांदेडमध्ये महापौरांच्या वॉर्डातच काळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; मनपा प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!
गोदावरी खरोखर प्रदूषणमुक्त?; मनपाच्या दाव्यांवर एनजीटीतील याचिकेमुळे प्रश्नचिन्ह!

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा भव्य सोहळा ५ व ६ जून रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक तथा युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. यावर्षी देशभरातून ५ ते ७ लाख शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवभक्तांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे व्यापक नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सव समितीचे सदस्य माधवराव देवसरकर यांनी दिली.

सोहळ्याची सुरुवात पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडेल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक केला जाईल. रणवाद्यांच्या गजरात होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, भव्य पालखी सोहळा आणि शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा हे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या सोहळ्यात युवराज छत्रपती संभाजीराजे शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असून, कोल्हापूर व पूर्णा येथील प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांचे दमदार सादरीकरण पाहायला मिळणार आहे.

COMMENTS