Homeताज्या बातम्या

आमदार-खासदार दूर का जात आहेत, याचे उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावेःखा. चव्हाणांचा थेट निशाणा

नांदेड : शिवसेनेतील सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षातून होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांन

राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल
नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली; काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी
नांदेड विधान परिषद : नोटांच्या राजकारणाने निष्ठा गिळंकृत; राजूरकरांच्या विजयाने महाविकास आघाडीचा बुरखा फाटला!सत्तेच्या सौद्यात पक्षनिष्ठांचा बाजार; पडद्यामागील गुप्त हातमिळवणीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले


नांदेड : शिवसेनेतील सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षातून होत असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेची आज जी अवस्था झाली आहे, ती पाहता उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि वाढता असंतोष यामुळेच आधी आमदार आणि आता खासदारदेखील त्यांच्यापासून दूर जात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोकराव चव्हाण यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्या विजयाबाबत त्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त करत, मी भविष्य सांगणारा माणूस नाही, त्यामुळे नेमका आकडा सांगणार नाही. मात्र, अमरनाथ राजूरकर यांना आवश्यक बहुमतापेक्षा कितीतरी अधिक मते मिळतील आणि त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावा केला. शिवसेनेतून सुरू असलेल्या पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर बोलताना चव्हाण म्हणाले, लोकांनी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत या लोकप्रतिनिधींना निवडून दिले होते, हे खरे आहे. मात्र पक्ष बदलणे किंवा स्वतंत्र भूमिका घेणे हा त्यांचा वैयक्तिक आणि पक्षांतर्गत विषय आहे. त्याचे परिणाम काय होतील, याचा निर्णय जनता आगामी काळात घेईल. आजच त्याबाबत कोणतेही भाकीत करणे योग्य ठरणार नाही. नांदेड महसूल आयुक्तालय लातूरला हलविण्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात माझ्याकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. लातूरमधील आमचे सहकारी लोकप्रतिनिधी या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या भूमिकेत असल्याचे समजते. जर सामंजस्याने मार्ग काढण्याची तयारी असेल, तर आम्हीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेतील वाढत्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर खासदार अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS