Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हदगाव वनपरिक्षेत्रातील वन जमिनीवरील काही अतिक्रमण  हटविले !

हदगाव प्रतिनिधी - हदगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव प्रा. अंतर्गत वनपरिमंडळ लोहा मधील नियतक्षेत्र मौजे घोगरी, मौजे तळ्याचीवाडी, गवतव

कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांचा महेश भुषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्कारांनी सन्मान
तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
शेकडो रिफायनरी विरोधक एकवटले

हदगाव प्रतिनिधी – हदगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय हदगाव प्रा. अंतर्गत वनपरिमंडळ लोहा मधील नियतक्षेत्र मौजे घोगरी, मौजे तळ्याचीवाडी, गवतवाडी राखीव वन कक्ष क्र 349 व 348 गट नं 29,33 मधील अतिक्रमण हटवणे कामी अतिक्रमण धारक यांचेवर कार्यवाही करुन दि. 29 मार्च 23 रोजी अतिक्रमण काढण्यास सुरवात करण्यात आले .एकुण 11.00 हेक्टर अतिक्रमण काढण्यात आले. बाकीचे अतिक्रमण जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत.या पाश्र्वभूमीवर काही नागरिक सन्माननीय कोर्टात गाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.  सदर अतिक्रमण निर्मलन कार्यवाही ही केशव वाबळे  उपवनसंरक्षक नांदेड, बी. एन ठाकुर सहाय्यक वनसंरक्षक ( तेंदु व कॅम्पा ) नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. हदगाव विजय कटके यांनी अतिक्रमण हटाव मोहिम राबवली अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही वेळी उपस्थित कर्मचारी व्हि.एस.गोरलावाड वनपाल मनाठा,ए.पी.झिनकरवाड वनपाल लोहा, अंबुलगेकर वनरक्षक, नितीन चव्हाण वनरक्षक , बनसोडे वनरक्षक,तेलंग वनरक्षक,धुळगंडे वनरक्षक घोगरी,सोनाळे मॅडम वनरक्षक,चाटसे वनरक्षक, वाघमारे वनरक्षक,अंकलगे वनरक्षक,गवळी वनरक्षक, पचलिंग वनरक्षक हदगाव वनपरिक्षेत्रातील सर्व वनपाल वनरक्षक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS