Homeताज्या बातम्या

पर्यावरण जनजागृतीसाठी तुलसी कॉलेजची रॅली

देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित वन महोत्सव सप्ताह अंतर्गत सोमवारी (दि. 6 जुलै

गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
आमच्या या जन्मात तरी हे रस्ते चांगले तयार होतील का?बीड शहरवासीयांमधून उद्विग्न प्रश्न  
जनगणनेसाठी आता घरोघरी प्रगणक येणार16 मे ते 14 जून दरम्यान घरभेटीद्वारे माहिती संकलनअचूक माहिती द्या, प्रशासनाला सहकार्य करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन



देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित वन महोत्सव सप्ताह अंतर्गत सोमवारी (दि. 6 जुलै)  शहरात पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा अशा विविध घोषणा देत विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणातून या रॅलीला सुरुवात झाली. हातामध्ये पर्यावरणाचा संदेश देणारे फलक  घेऊन विद्यार्थिनी रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत या रॅलीच्या माध्यमातून वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि जलसंधारणाचा संदेश देण्यात आला.  या रॅलीचे नियोजन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.श्वेता वंजारे यांनी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे तसेच सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS