Homeताज्या बातम्या

वरपगावचे भूमिपुत्र प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांना ‘राजर्षी शाहू महाराज नॅशनल अवार्ड 2026’ प्रदान

केज: केज तालुक्यातील वरपगावचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष तथा शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूजचे माजी प्राचार्य डॉ.

नीट आंदोलनामुळे मुंबईत कठोर निर्बंध; ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय मोर्चा किंवा आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा
सौ. के.एस.के. महाविद्यालयात विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन; शेतकर्‍यांना विषमुक्त व शाश्वत शेतीचे प्रत्यक्ष धडे

केज: केज तालुक्यातील वरपगावचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष तथा शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूजचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राजर्षी शाहू महाराज नॅशनल अवार्ड 2026’ प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी केलेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन तसेच सामाजिक समानता व राष्ट्रनिर्मितीसाठी दिलेले योगदान याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. डॉ. देशमुख यांनी 1980 पासून ग्रामस्वच्छता, साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, रक्तदान, वृक्षारोपण व संवर्धन, मतदार नोंदणी, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना तीन वेळा राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने गौरविले आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार (2007), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (2016) तसेच विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन, दिल्ली यांनीही त्यांचा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरव केला आहे. डॉ. आबासाहेब देशमुख यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल केज तालुक्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS