Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोचिंगशिवाय अकोलेचा श्रेयस एमपीएससीत राज्यात दुसरा

अकोले : मोठ्या शहरांत कोचिंग क्लासेसच्या गर्दीतून यश मिळवणाऱ्यांची उदाहरणे अनेक आहेत… पण कोणत्याही क्लासशिवाय, दुर्गम भागातून केवळ जिद्द, मेहनत आणि स्वअभ्यासाच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावणारा श्रेयस मंडलिक हा तरुण आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अकोले तालुक्यातील माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार (श्रेणी-१) परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले. विशेष म्हणजे, कोणताही कोचिंग क्लास न लावता हे यश मिळवल्यामुळे त्याच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  २०२२ च्या परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्यानंतर अनेक जण खचून गेले असते… मात्र श्रेयसने हार मानली नाही. अपयशाला धडा मानत त्याने अधिक जोमाने तयारी केली आणि अखेर २०२४ मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवत स्वतःची क्षमता सिद्ध केली. श्रेयसचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नवलेवाडी (ता. अकोले) येथे चौथीपर्यंत झाले. पुढे अकोले येथील अगस्ति विद्यालयातून दहावी पूर्ण केल्यानंतर संगमनेर येथील डी.ए. ओहरा ज्युनियर कॉलेजमधून बारावी (विज्ञान शाखा) शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.  ‘स्वप्न मोठं असेल, तर मार्ग स्वतः तयार होतो’ — श्रेयस मंडलिकची ही यशोगाथा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आशेचा दीप ठरत आहे. कोचिंग नाही; तरीही यश एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो रुपये खर्च करूनही अनेकांना यश मिळत नाही. मात्र श्रेयसने कोणत्याही कोचिंगशिवाय स्वअभ्यासावर विश्वास ठेवत हे यश मिळवले. “हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना त्याची आई सविता मंडलिक आणि वडील दिलीप मंडलिक यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांचा जल्लोष, सत्कार समारंभ श्रेयसच्या यशानंतर अकोले नगरपंचायत परिसरात त्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले समता परिषद अकोले आणि अकोले तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून आलेल्या या यशस्वी तरुणावर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव

अकोले : मोठ्या शहरांत कोचिंग क्लासेसच्या गर्दीतून यश मिळवणाऱ्यांची उदाहरणे अनेक आहेत… पण कोणत्याही क्लासशिवाय, दुर्गम भागातून केवळ जिद्द, मेहनत आणि स्वअभ्यासाच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावणारा श्रेयस मंडलिक हा तरुण आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

अकोले तालुक्यातील माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार (श्रेणी-१) परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले. विशेष म्हणजे, कोणताही कोचिंग क्लास न लावता हे यश मिळवल्यामुळे त्याच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 २०२२ च्या परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी संधी हुकल्यानंतर अनेक जण खचून गेले असते… मात्र श्रेयसने हार मानली नाही. अपयशाला धडा मानत त्याने अधिक जोमाने तयारी केली आणि अखेर २०२४ मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवत स्वतःची क्षमता सिद्ध केली.

श्रेयसचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नवलेवाडी (ता. अकोले) येथे चौथीपर्यंत झाले. पुढे अकोले येथील अगस्ति विद्यालयातून दहावी पूर्ण केल्यानंतर संगमनेर येथील डी.ए. ओहरा ज्युनियर कॉलेजमधून बारावी (विज्ञान शाखा) शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.  ‘स्वप्न मोठं असेल, तर मार्ग स्वतः तयार होतो’ — श्रेयस मंडलिकची ही यशोगाथा प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी आशेचा दीप ठरत आहे.

कोचिंग नाही; तरीही यश

एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो रुपये खर्च करूनही अनेकांना यश मिळत नाही. मात्र श्रेयसने कोणत्याही कोचिंगशिवाय स्वअभ्यासावर विश्वास ठेवत हे यश मिळवले. “हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना त्याची आई सविता मंडलिक आणि वडील दिलीप मंडलिक यांनी व्यक्त केली.

गावकऱ्यांचा जल्लोष, सत्कार समारंभ

श्रेयसच्या यशानंतर अकोले नगरपंचायत परिसरात त्याची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले समता परिषद अकोले आणि अकोले तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातून आलेल्या या यशस्वी तरुणावर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS