Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

अकोले : अकोले तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि अजब प्रकार समोर आला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि शेतकरी पूर्वमशागतीसाठी डिझेल खरेदी

कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात
डॉ. शिंदे यांना ‘स्व. अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार’ जाहीर
नेदरलँडच्या संशोधिकेची गारगोटी संग्रहालयाला भेट
The agreement will exploit farmers through agriculture: Dr Ajit Navale

अकोले : अकोले तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि अजब प्रकार समोर आला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि शेतकरी पूर्वमशागतीसाठी डिझेल खरेदी करायला जात असताना, पेट्रोल पंप चालक त्यांच्याकडे चक्क ‘सातबारा’ मागत आहेत. पंप चालकांच्या या अजब अटीमुळे शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होत असून, माकपचे नेते डॉ. अजित नवले यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सध्या शेतकरी शेताची नांगरणी आणि मशागतीच्या कामात व्यस्त आहे. ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डिझेलची गरज भासत आहे. मात्र, अकोले तालुक्यात डिझेल खरेदीसाठी पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांकडे सातबारा उताऱ्याची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर परिस्थितीवर बोलताना किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले की, “खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी अशा अटींना सामोरे जावे लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण खरीप हंगामाची पूर्वमशागत धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.”
शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डिझेलसाठी सातबारा मागणाऱ्या अशा पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांना खरीप तयारीसाठी आवश्यक असलेली खते, बियाणे आणि इंधन प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात असताना, आता अशा प्रशासकीय आणि स्थानिक जाचाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. आता जिल्हाधिकारी अशा पेट्रोल पंप चालकांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS