Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातेवाडीच्या श्रेयशची ‘नवोदय’साठी निवड

 अकोले : तालुक्यातील कोतुळ बीटमधील जांभळेवाडी (सातेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रेयश दिलीप गभाले य

ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक
एनएमएमएस परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे यश
कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन

 अकोले : तालुक्यातील कोतुळ बीटमधील जांभळेवाडी (सातेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रेयश दिलीप गभाले याने ‘जवाहर नवोदय विद्यालय’ प्रवेश परीक्षेत ९७.५० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर त्याची टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात जिल्हास्तरावर १९ व्या क्रमांकाने निवड झाली आहे.

 आदिवासी व दुर्गम भागातून शिक्षण घेत असताना श्रेयशने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसमोर त्याने आदर्श निर्माण केला आहे. श्रेयशला गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख भवरे, वाकचौरे, मुख्याध्यापक देशमुख तसेच शिक्षक अजय चौधरी व हरदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सरपंच केशव बुळे, शिक्षक दिपक बोऱ्हाडे, दिलीप गंभीरे, मनोहर गोडे, वैभव लाटणे, राहुल गोडे, पुनाजी गोडे आदींसह ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून कौतुक केले.

COMMENTS