Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत ज्ञानेश्‍वर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कोपरगाव शहर : येथील संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये नुकतेच 1 मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध क

शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले
मुख्याधिकारी सरोदे यांची अखेर बदली
नांदगावच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब गुंड 

कोपरगाव शहर : येथील संत ज्ञानेश्‍वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये नुकतेच 1 मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मन जिंकून घेतले.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्‍वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख व मादी इंटरनॅशनल दुबई चे सीनियर मॅनेजर जयदीप वालटे हे हजर होते. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी विश्‍वस्त विशाल झावरे,शंकर यादव,दिलीप सोनवणे व विक्रांत झावरे यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती,संत ज्ञानेश्‍वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे व रायगड येथील शिवाजी महाराज्यांच्या समाधी स्थळाच्या मातीच्या कलशाचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. पाहुण्यांची ओळख शाळेच्या शिक्षिका पूनम सूर्यवंशी व अनिता खरात यांनी करून दिली. शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी वाचून दाखवला. त्या नंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या मध्ये शाळे अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये रायगड हा ग्रुप अव्वल ठरला व शाळेचे बहुचर्चित सन्मानचिन्ह या ग्रुपला देण्यात आले. यावेळी रायगड ग्रुपच्या मार्गदर्शिका चैताली पुंडे, पूनम सूर्यवंशी व विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. उडाण या विशिष्ठ संकल्पनेवर आधारित संस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना करत अतिशय उत्साहात सुरुवात केली. त्यानंतर नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या चिमुकल्यांनी दाक्षिणात्य गाण्यांवर तसेच पाहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बॉलीवूड, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण, चौथीच्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान-3, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अभिनंदन वर्धमान सहावीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम, सातवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आठवीच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम व साऊथ, नववीच्या विद्यार्थिनींनी विनोदी अभिनय व नववीच्या विद्यार्थ्यांनी बॉलीवूड या गाण्यांवर उत्कृष्ठ सादरीकरण करत पाहुण्यांचे व उपस्थितांचे मन जिंकून घेतले. कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली लोखंडे, ऋतुजा कुलकर्णी व स्वाती गहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या

COMMENTS