शेवगाव : शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा-२०२४ मधून सहायक राज्य कर आयुक्त (जीएसटी) (वर्ग-१) पदावर निवड झाल्याने तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा-२०२४ ची अंतिम गुणवत्ता यादी ८ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केली होती. त्यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी शिफारसपत्र निर्गमित करण्यात आले. या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाने २८ जुलै २०२६ रोजी सहायक राज्य कर आयुक्त (जीएसटी) पदाचे नियुक्ती आदेश जारी केले.सोनल शहा यांनी ग्रामविकास विभागात गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना शेवगाव तालुक्यात विकासकामांना गती देणे, प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामकाज यावर भर देत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले. राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करून वर्ग-१ पदावर निवड झाल्यानंतर त्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यानिमित्त सोनेसांगवी मा.सरपंच रामकिसन मडके, गोळेगाव सरपंच संजय आंधळे, जोहरापुर मा.सरपंच रोहण लांडे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम चव्हाण, सचिन भाकरे उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून नव्या पदावरही त्या कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासनाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS