बीड : बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या पंचतारांकित एमआयडीसी उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे.

बीड : बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या पंचतारांकित एमआयडीसी उभारणीसाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीनंतर पुढील आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने या प्रकल्पाला गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बीड जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास राहिलेला असून येथे मोठ्या उद्योगांची कमतरता जाणवते. परिणामी, स्थानिक युवकांना रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध होतात आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतराची समस्या निर्माण होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी बीडमध्ये आधुनिक सुविधांनी सुसज्ज पंचतारांकित एमआयडीसी उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. संदीप क्षीरसागर यांनी यापूर्वीही या विषयावर सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. त्यांनी उद्योगमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत बीडच्या भौगोलिक स्थितीचा, उपलब्ध मनुष्यबळाचा तसेच औद्योगिक विकासासाठी असलेल्या संभाव्यतेचा सविस्तर आढावा मांडला. तसेच, या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. पुढील आठवड्यात मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्यांसह सविस्तर बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये प्रकल्पाची रूपरेषा, जागेची निवड, आवश्यक पायाभूत सुविधा आणि निधी याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, बीड शहरालगत असलेल्या घोडका राजुरी आणि काठोडा या भागात एमआयडीसीसाठी योग्य जागेचा विचार सुरू असून, प्रशासकीय पातळीवर प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभारल्यास वाहतूक, पाणीपुरवठा, वीज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे सोपे जाईल, असेही मानले जात आहे. पंचतारांकित एमआयडीसी उभारणीमुळे केवळ मोठे उद्योगच नव्हे, तर लघु व मध्यम उद्योगांनाही चालना मिळेल. रपलळश्रश्ररीू र्ीपळीीं, सेवा क्षेत्र आणि व्यापारी व्यवहारांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प टर्निंग पॉईंट ठरू शकतो. एकंदरीत, मंत्रालय स्तरावर होणारी आगामी बैठक ही बीडच्या औद्योगिक भविष्यासाठी निर्णायक ठरणार असून, या बैठकीनंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS