Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी

कडा : वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल, कडा या सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त शाळेने 10 वी बोर्ड परीक्षेत यंदाही उज

नागवडे स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम
शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

कडा : वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल, कडा या सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त शाळेने 10 वी बोर्ड परीक्षेत यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत 100% निकालाची नोंद केली आहे. या उत्कृष्ट निकालामुळे शाळेचा परिसरात नावलौकिक अधिक वाढला आहे.
या परीक्षेत ग्रीशा भंडारी हिने 96.20% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. साक्षी ढोबळे हिने 92.60% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर विराट पालकर याने 91.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. याशिवाय शाळेतील एकूण 13 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरले आहे. शाळेतील अध्यापन पद्धती, नियमित सराव परीक्षा आणि वैयक्तिक लक्ष देण्याची पद्धत यामुळे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित राठोड, उपाध्यक्ष श्री. संदीप चानोदिया, सचिव श्री. हेमंत मेहेर, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी श्री. मनीष गांधी, श्री. प्रकाश श्रीश्रीमाळ, श्री. अमोल पटवा, श्री. संजय पितळे, श्री. संतोष गांधी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक श्री. के. अभिलाष, सल्लागार श्री. पी. जी. मेहेर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिकांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शाळेच्या या भव्य यशामुळे कडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS