नांदेड : नांदेड विभागातील धेंगली पिंपळगाव - मानवत रोड रेल्वे मार्गावरील 257/82 किलोमीटर परिसरात गुरुवारी आगीची घटना घडली. आग रेल्वे रुळांपासून का
नांदेड : नांदेड विभागातील धेंगली पिंपळगाव – मानवत रोड रेल्वे मार्गावरील 257/82 किलोमीटर परिसरात गुरुवारी आगीची घटना घडली. आग रेल्वे रुळांपासून काही अंतरावर लागल्याने रेल्वे वाहतुकीला तात्काळ धोका निर्माण झाला नाही. मात्र, आग रेल्वेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पसरण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले.
स्थानिक प्रशासन, ग्रामप्रतिनिधी आणि रेल्वे सुरक्षा दल (ठझऋ) यांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि विझवण्यासाठी त्वरित प्रयत्न करण्यात आले. या घटनेदरम्यान संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक विनाअडथळा सुरू राहिली. प्राथमिक तपासात जवळील शेतजमिनींमध्ये पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने शेतकरी आणि नागरिकांना रेल्वे रुळांजवळ शेतीतील कचरा किंवा पिकांचे अवशेष जाळू नयेत, असे आवाहन केले आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अशा आगीमुळे रेल्वेच्या विद्युत तारा, सिग्नल यंत्रणा, केबल्स तसेच इतर महत्त्वाच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर अपघातांचा धोका निर्माण होतो. रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 153 नुसार, निष्काळजीपणा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाईची तरतूद आहे. दोषी आढळणार्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास, आर्थिक दंड तसेच रेल्वे मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करावी लागू शकते. दक्षिण मध्य रेल्वेने नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत, रेल्वे परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS