Homeताज्या बातम्या

विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना २५०० राख्या भेट

संगमनेर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यातील सर्व जवानांकरता सह्याद्री विद्यालया

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
नांदेडमध्ये प्राध्यापकाला ५१ लाखांचा ‘डिजिटल अरेस्ट’चा गंडा; तर तोतया पोलिसांकडून वृद्धांचे दागिने लांबवले
नांदेड शहरातील स्वच्छतेचा कचरा उचलायचा की पैसे घ्यायचे? विवेकनगरमध्ये घनकचरा कर्मचाऱ्यांच्या मुजोरीविरोधात नागरिकांचा संताप

संगमनेर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत देशवासीयांच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यातील सर्व जवानांकरता सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी २५०० राख्या बनवून पाठवल्या आहेत.

जय हिंद महिला मंच, स्वराज्य कल्याण संस्था व सह्याद्री विद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी राख्या बनवल्या व त्या आज पाठवण्यात आल्या आहेत. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुक्यातील माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या स्वराज्य कल्याण संस्थेच्या सदस्यांकडे या राख्या सुपूर्त करण्यात आल्या.

याप्रसंगी दुर्गा तांबे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. खेमनर, स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष मेजर प्रकाश कोटकर, कॅप्टन भिकाजी भागवत, पॅरा कमांडो लक्ष्मणराव ढोले, सुभेदार मेजर गिरीश एरंडे, कॅप्टन अनिल पावसे, सुभेदार भानुदास पोखरकर, सुभेदार रघुनाथ पवार, सुभेदार गोविंद खरडे, रामनाथ ढोले, सुभेदार मेजर गुंजाळ मतकर, सुभेदार प्रकाश पवार, सुभेदार संभाजी पाचारणे व जय हिंद महिला मंचच्या सदस्या सुषमा भालेराव, सुनीता कांदळकर, राधिका डॉलर उपस्थित होत्या. तर सह्याद्री महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा दिघे, पर्यवेक्षक किशोर देशमुख, अण्णासाहेब दिघे, मीरा ढोले, अर्चना घोरपडे, गीताराम शेळके, एकनाथ भागवत, वरपे मॅडम यांसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दुर्गा तांबे म्हणाल्या की, भारतीय सैनिक हे ऊन, वारा, पाऊस यांची परवा न करता देशवासीयांचे सदैव रक्षण करत असतात. सणासुदीच्या काळात त्यांना घरी येणे जमत नाही. त्यांच्या या कर्तव्यप्रती कृतज्ञता म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी त्यांना सीमेवर राख्या पाठवत असतो. यावर्षीही सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी राख्या बनवून त्या पाठवल्या आहेत. शेतकरी व सैनिक यांच्या प्रति प्रत्येकानेच कृतज्ञता बाळगावी, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

तर मेजर प्रकाश कोटकर म्हणाले की, युवकांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे, देशभक्ती ओतप्रोत भरून राहावी म्हणून आपण या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. सैनिक आपले घरदार सोडून सीमेवर शत्रूपासून आपले संरक्षण करतात, त्यांच्या प्रति सर्वांच्या मनात कृतज्ञता वाढावी व देशभक्ती जागृत व्हावी हे गरजेचे आहे. तसेच जय हिंद महिला मंचाच्या वतीने दरवर्षी सैनिकांसाठी दिवाळीचा फराळ व राख्या पाठवल्या जातात, त्याबद्दल त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व दुर्गा तांबे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.

COMMENTS