Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड रेल्वे विभागाची तिकीट तपासणीत विक्रमी कामगिरी; एप्रिल महिन्यात 1.50 कोटी उत्पन्नाची नोंद

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने एप्रिल 2026 महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेत विक्रमी कामगिरी करत 1.50 कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे.

उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकरी व नागरिकांना आवाहन
काकीनाडा-हिसार विशेष गाडीला मुदतवाढ

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने एप्रिल 2026 महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेत विक्रमी कामगिरी करत 1.50 कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे. एप्रिल महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा असून, गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये मिळालेल्या 1.34 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, 23 एप्रिल 2026 रोजी एका दिवसातच 7.91 लाख इतके विक्रमी उत्पन्न मिळाले. विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या दक्षतेमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.  तिकीट तपासणी पथकाचे समर्पण, शिस्तबद्धता, कर्तव्यनिष्ठा आणि प्रभावी टीमवर्क यामुळे विनातिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात विभागाला यश आले आहे. तसेच प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावरून स्पष्ट होते. नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन केले. विविध विभागांतील समन्वय आणि व्यावसायिकतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. नांदेड विभाग सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी-अनुकूल रेल्वे सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यातही प्रगतीची ही वाटचाल कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

COMMENTS