Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड विभागाने पूर्णा डिपोवर वॅगन तपासण्या वाढवून मालवाहतूक कार्यक्षमता सुधारली

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड (एनईडी) विभागाने वित्तीय वर्ष 2025-26 दरम्यान पूर्णा (पीएयू) डिपोवरील वॅगन तपासण्यांची संख्या वाढवून मालवा

भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक भरारी; चीनसोबत वाढले व्यवहार
‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे राज्याची वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल !

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड (एनईडी) विभागाने वित्तीय वर्ष 2025-26 दरम्यान पूर्णा (पीएयू) डिपोवरील वॅगन तपासण्यांची संख्या वाढवून मालवाहतूक कार्यक्षमता बळकट करण्यात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
सुधारित कार्यपद्धती आणि अधिक सक्षम देखभाल व्यवस्थेच्या बळावर, पूर्णा डिपोवरील वॅगन तपासण्यांची एकूण संख्या 2024-25 मधील 248 वरून 2025-26 मध्ये 282 पर्यंत वाढली आहे. विशेष म्हणजे, प्रीमियम वॅगन तपासण्यांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी 55 प्रीमियम तपासण्या करण्यात आल्या होत्या, तर यावर्षी त्या थेट 158 वर पोहोचल्या आहेत. प्रीमियम तपासण्या म्हणजे जलद, अचूक आणि सखोल तपासणी प्रक्रिया होय. या प्रक्रियेमुळे वॅगन कमी वेळेत सेवेसाठी तयार होतात आणि उच्च दर्जाचे सुरक्षा व गुणवत्ता निकष कायम राखले जातात. परिणामी, मालगाड्यांची उपलब्धता वाढून त्यांचा टर्नअराउंड वेळ कमी होतो आणि एकूण मालवाहतूक व्यवस्थेत गती येते. या सुधारणेमुळे परिसरातील उद्योग व व्यापार्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, ते आता आपला माल अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक करू शकतात. यामुळे स्थानिक लॉजिस्टिक व्यवस्था अधिक सक्षम बनत असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. नांदेड विभागाचे हे यश त्यांच्या मालवाहतूक सेवा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. येत्या काळातही विभाग नवोन्मेषी उपाययोजना राबवून आणि पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून मालवाहतूक क्षमतेत वाढ करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.

COMMENTS