Homeताज्या बातम्यादेश

देवदर्शनाहून परतताना मोठी दुर्घटना

कर्नाटक प्रतिनिधी - कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात बस- आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनासाठी निघालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला असून

यवतमाळ-अमरावती मार्गावरील अपघातात चौघांचा मृत्यू
 औद्योगिक नगरीत हायवाखाली चिरडून एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू
कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले

कर्नाटक प्रतिनिधी – कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात बस- आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनासाठी निघालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. कनकापुरा तालुक्यातील केम्माले गेटजवळ ही दुर्घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामनगर जिल्ह्यातील केएसआरटीसी बस आणि कारमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कारमधील प्रवासी तीर्थक्षेत्र माले महाडेश्वराहिल येथून बेंगळुरूला जात होते. कर्नाटक सरकारची बस बंगळुरूहून मालवल्लीच्या दिशेने जात होती.

दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जोराची होती की सहा जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला तर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना रामनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काकूर झाला.

COMMENTS