Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील दोन महत्त

नांदेड विभागाने पूर्णा डिपोवर वॅगन तपासण्या वाढवून मालवाहतूक कार्यक्षमता सुधारली
उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी; 4.65 लाखांचा महसूल
तपोवन एक्स्प्रेसचा एक डबा वाढवणार - tapovan express will increase one tier  - Maharashtra Times

नांदेड : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार तपोवन एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रत्येकी दोन सामान्य श्रेणी (ॠड) डबे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्यांची एकूण रचना 18 डब्यांवरून 20 डब्यांची होणार आहे. वाढ करण्यात येणार्‍या गाड्या: 1) गाडी क्र. 17618/17617 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड (तपोवन एक्सप्रेस) नांदेड येथून 29 एप्रिल 2026 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 30 एप्रिल 2026 2) गाडी क्र. 17688/17687 धर्माबाद – मनमाड – धर्माबाद (मराठवाडा एक्सप्रेस) धर्माबाद व मनमाड येथून अंमलबजावणी : 28 एप्रिल 2026 या कायमस्वरूपी वाढीमुळे प्रवाशांना अधिक आसन क्षमता उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल. परिणामी प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

COMMENTS