Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीपंपाच्या वीजबिलावरील व्याज माफीची मागणी; उर्वरित थकबाकीवर ५० टक्के सवलत द्यावी; डॉ. पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील जुन्या थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ करून उर्वरित रकमेवर ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी विमानतळावर भेट घेऊन केली. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने सध्या शेतीपंपासाठी वीज मोफत केली असली तरी जुन्या थकबाकीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शेतजमीन विक्री, कुटुंबातील वाटप किंवा वीज कनेक्शनचे हस्तांतरण करताना थकीत वीजबिल अडथळा ठरत असून शेतकऱ्यांचे व्यवहार रखडत आहेत. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलावरील संपूर्ण व्याज माफ करून मूळ थकबाकीत किमान ५० टक्के सवलत दिल्यास शेतकरी स्वेच्छेने उर्वरित रक्कम भरण्यास पुढे येतील. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच शासनाच्या महसुलातही वाढ होईल, असे डॉ. पिपाडा यांनी नमूद केले. राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा स्थितीत वीजबिलावरील व्याज माफी आणि ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत व संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी थकबाकी भरण्यास पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली. 

बुळे पठारमध्ये तीव्र पाणीटंचाई महिलांसह चिमुरड्यांची वणवण; एक हंड्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट
माजी आ.नरेंद्र घुले यांनी घेतली दुकळे कुटुंबाची भेट; शोकग्रस्त परिवाराचे केले सांत्वन
मासिक सभांना गैरहजेरी; काष्टी ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस

राहाता : शेतकऱ्यांच्या शेतीपंपावरील जुन्या थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ करून उर्वरित रकमेवर ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी विमानतळावर भेट घेऊन केली. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाघमारे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने सध्या शेतीपंपासाठी वीज मोफत केली असली तरी जुन्या थकबाकीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शेतजमीन विक्री, कुटुंबातील वाटप किंवा वीज कनेक्शनचे हस्तांतरण करताना थकीत वीजबिल अडथळा ठरत असून शेतकऱ्यांचे व्यवहार रखडत आहेत.

या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलावरील संपूर्ण व्याज माफ करून मूळ थकबाकीत किमान ५० टक्के सवलत दिल्यास शेतकरी स्वेच्छेने उर्वरित रक्कम भरण्यास पुढे येतील. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच शासनाच्या महसुलातही वाढ होईल, असे डॉ. पिपाडा यांनी नमूद केले.

राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले असून शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अशा स्थितीत वीजबिलावरील व्याज माफी आणि ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत व संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी थकबाकी भरण्यास पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली. 

COMMENTS