Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला नग्न धिंड प्रकरणाचा जाहीर निषेध- प्रा. सुशिलाताई मोराळे

बीड - गेली तीन महिन्यापासून मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत 160 पेक्षा जास्त जीवित हानी झाली आहे. 4 मे ला शेकडोची गर्दीने 5 लोकां

त्या दोन एनसीबीच्या अधिकार्‍यांची बडतर्फी
रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबधांतून ; बाळ बोठेसह इतर आरोपीविरुद्ध पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
राज्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

बीड – गेली तीन महिन्यापासून मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत 160 पेक्षा जास्त जीवित हानी झाली आहे. 4 मे ला शेकडोची गर्दीने 5 लोकांवर हल्ला केला. हिंसा, आग लावली मारपीठ झाली. मैंथेई आणि कुकी यांच्यात हा वाद आहे. मैंथेईनी कुकीवर हल्ला केला. झोपेत हा हल्ला झाला. चाकू,रायफल हत्यारे लोकांच्या हातात होते. मैंथैईनी 4 मे ला हल्ला केला.
ए के 47 सारखी हत्यारे होती. 3 महिला 2 पुरुष जीव वाचवन्यासाठी पळत होते. पोलिस तमाशा बघत होते. पोलीस वाचवतील अस वाटत होत पण तस झालं नाही. त्यानंतर  महिलेचे कपडे उतरले त्यांना नग्न केले त्यांच्यावर रेप झाले. देशाला विश्वगुरू करण्याची भाषा सुरू आहे. अजून पी एम मणिपूरला गेले नाहीत 3 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यामुळे पी एम बोलले जे बोलले ते अचंबित करणारे होते. त्यांनी मणिपूर चा उल्लेख केला पण राजस्थान, छतीसगड इत्यादी मध्ये घडलेल्या घटनेवर जास्त जोर दिला मणिपूरच्या राज्यपाल यांचा व्हिडिओ खूप गंभीर आहे. अमानवीयते विरोधी त्या बोलत आहेत. हे कधी थांबणार असे त्या  म्हणत आहेत. देश शर्मसार है अस पि एम बोलले खर म्हणजे शर्मसार पी.एम. नी व्हायला पाहिजे. महाभारत पुन्हा घडले द्रौपदीचे वस्त्रहरण पुन्हा केले दुर्योधन, दू:शासन, आंधळा धृतराष्ट्र, कृपाचार्य, द्रोणाचार्य जसे गप्प बसले पांडवांनी खाली माना घातल्या तदनंतरच दिल्लीचे धूर्तराष्ट्र आंधळे बनले.  कितीदा द्रौपदीचे विटंबना केली जाणार 79 दिवसानंतर पी एम नी तोंड उघडले 60 हजार बेघर 5 हजार घरांना आगी लावल्या मानवाधिकाराचे प्रचंड उल्लंघन झाले आहे. मणिपूरचे सी एम त्यांच्या पदावर विराजमान आहेत.या शर्मणाक घटनेनंतर तरी त्यांनी राजीनामा देणे अभिप्रेत होते. या घटनेची जितकी निंदा करावी तितकी कमीच आहे. मणिपूरच्या घटनेच्या विरोधी संघटित होऊनच संघर्ष करावा लागेल. लोकशाही टिकवण्यासाठी संघटित व्हा असे आव्हान प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.

COMMENTS