Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेनापती बापट पतसंस्थेच्या संचालकांविरोधात उद्रेक; माजी आमदार विजय औटींच्या घरासमोर ठेवीदारांची घोषणाबाजी

पारनेर :  आपल्या आयुष्याची पुंजी आणि घामाचा पैसा सेनापती बापट मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अडकल्याने संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी पा

कोरेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत फाळके गटाची बाजी
जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  

पारनेर :  आपल्या आयुष्याची पुंजी आणि घामाचा पैसा सेनापती बापट मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अडकल्याने संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी पारनेर शहरात आक्रमक पवित्रा घेतला. गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासूनच तालुक्यातील विविध भागांतून ५०० ते ८०० ठेवीदार पारनेरच्या बाजार तळावर एकत्र जमले होते.  

बाजार तळावरून या आंदोलकांनी पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतून एक भव्य रॅली काढली. माजी आमदार विजयराव औटी यांच्या बंगल्यासमोर  संतप्त ठेवीदारांनी जोरदार निदर्शने केली. संस्थापक विजय औटी, अनिकेत औटी, संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, मुख्य कार्यकारी व्यवस्थापक रामदास झंजाड यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली.

यावेळी ठेवीदार आंदोलक एकनाथ औटी, हरिभाऊ औटी, सिताराम दुधाडे, राजेश येवले, रवींद्र येवले, भीमसेन येवले, विश्वनाथ शिंदे, काकासाहेब काळे, प्रवीण आदमाने, ऍड. ऋषिकेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याबद्दल ठेवीदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात ठेवीदारांनी मागणी केली आहे की, या घोटाळ्याचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे आणि संस्थेसह सर्व माजी व विद्यमान संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त कराव्यात. या मालमत्तांच्या लिलावातून ठेवीदारांची देणी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच गृह विभागाने या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.

सेनापती बापट पतसंस्थेमध्ये बोगस कर्ज वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे सूर्यतारा इंडस्ट्रीजला 13 कोटी रुपये दिले सेनापती बापट पतसंस्था संचालक व सूर्यतारा इंडस्ट्रीजचे सभासद हे जवळपास एकच आहेत असे कर्ज वितरण करता येत नाही इतरही अनेक लोकांना बोगस कर्ज प्रकरणे संस्थेने केली असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. :  ऍड. ऋषिकेश शिंदे (पीडित ठेवीदारांचे वकील)

COMMENTS