Homeताज्या बातम्या

मनसे विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम खेडकर यांची निवड; शासकीय विश्रामगृहातील बैठकीत नियुक्ती जाहीर

खरवंडी कासार: पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा तथा मन

विठ्ठल नामाच्या गजरात सहयोग कॅम्पस झाला भक्तिमय; चिमुकल्या वारकर्‍यांच्या दिंडीने वेधली सर्वांची मने
माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकर्‍यांना मार्गदर्शन; सोयाबीन पिकासाठी विषमुक्त शेतीचा संदेश
श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सत्कार

खरवंडी कासार: पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची बैठक विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा तथा मनसे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीस पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील असंख्य विद्यार्थी सैनिक व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी ओम देविदास खेडकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. बैठकीत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून पुष्पगुच्छ देत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

ओम खेडकर यांच्या या निवडीबद्दल शहर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, कर्जत तालुकाध्यक्ष सचिन सटाले, प्रल्हाद कीर्तने, शहादेव खेडकर व देविदास खेडकर यांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मनसे तालुका उपाध्यक्ष अशोकराव आंधळे, लक्ष्मण डांगे यांच्यासह शेवगाव मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अजिंक्य अंधारे, सचिन फुंदे, अंगद फुंदे, ओंकार फुंदे, कैलास फुंदे, अजय फुंदे, मुकुंद फुंदे, निशांत फुंदे, शुभम फुंदे, अमर फुंदे, कानिफ खेडकर, स्वराज खेडकर, अशोक खामकर, प्रतीक रांधवणे, अजिंक्य अंदुरे, सोमनाथ घुले, अंबादास ढाकणे, प्रदीप जगताप, अक्षय फुंदे, देविदास साबळे, प्रवीण घुले, विश्वास साबळे, उमेश शिरसाठ, गोविंद गर्जे आणि सचिन पंडित यांच्यासह पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS