Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणूक वार्तापत्र; संघर्षाला कंटाळले तनपुरे? आज भाजप प्रवेशाचा फैसला

देवळाली प्रवरा : राहुरीच्या राजकारणात आता ‘निष्ठा’ विरुद्ध ‘सत्ता’ हा संघर्ष उघडपणे रस्त्यावर आला आहे आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत माजी म

एनएमएमएस परीक्षेत कोतुळेश्वर विद्यालयाचे यश
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
कोपरगाव आगारासाठी नवीन पाच बस

देवळाली प्रवरा : राहुरीच्या राजकारणात आता ‘निष्ठा’ विरुद्ध ‘सत्ता’ हा संघर्ष उघडपणे रस्त्यावर आला आहे आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. त्यांच्या ताज्या वक्तव्यांनी केवळ खळबळ नाही, तर त्यांच्या भूमिकेतील बदलाचा थेट इशाराच दिला आहे.“विचार जपले… पण सत्ता गमावली,”असे म्हणत तनपुरेंनी स्वतःच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वर्षानुवर्षे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचा अभिमान मिरवणारे तनपुरे आता त्याच निष्ठेचा ‘फटका बसला’ असे जाहीरपणे सांगत आहेत. हेच त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचे सर्वात मोठे संकेत मानले जात आहेत.
 “सत्ता नाही, तर अस्तित्व नाही !”तनपुरेंची कडवी कबुली दिली आहे.“माझ्यासोबतचे अनेक जण सत्तेत गेले आणि आज मंत्री आहेत.. मी मात्र आमदारकीही गमावली,” या शब्दांत तनपुरेंनी आपली हतबलता मांडली. ही केवळ खंत नाही तर सत्तेबाहेर राहण्याची राजकीय किंमत त्यांनी उघडपणे मान्य केली आहे.कार्यकर्त्यांची अवस्था सांगताना त्यांनी आणखी थेट शब्द वापरले“सत्ता नसेल तर कार्यकर्त्यांची गळचेपी होते.”
 यातून स्पष्ट संदेश जातोय आता ‘निष्ठा’ आणि विचारांपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरतेय का?कार्यकर्त्यांमध्ये फूट, नेत्यासमोर ‘कठीण निर्णय’तनपुरेंच्या गोटातही आता दोन गट उघड झाले आहेत. एक गट स्पष्टपणे सत्तेत जाण्याचा आग्रह धरतोय, तर दुसरा गट अजूनही निष्ठेवर ठाम आहे.पण तनपुरेंचे वक्तव्य पाहता ते स्वतःही या द्वंद्वातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. “संघर्ष किती दिवस करायचा?” हा त्यांचा प्रश्नच त्यांच्या पुढील निर्णयाची दिशा दाखवतो.
 भाजप प्रवेश जवळपास निश्चित? राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा तनपुरे भाजपमध्ये जाणार का? सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच प्रवेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.जर हे घडले, तर तनपुरेंचा ‘एकनिष्ठतेचा’ प्रवास थेट सत्तेच्या दारात संपणार का, हा मोठा प्रश्न उभा राहतोय.

निवडणूक टाळली; आता ‘डायरेक्ट सत्ता’?
 राहुरी पोटनिवडणुकीतून अचानक माघार घेतल्यानंतरच तनपुरेंच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला होता.आता त्यांच्या वक्तव्यांनंतर चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणूक टाळली आणि आता थेट सत्तेत एन्ट्री? तनपुरेंची भूमिका आता उघड होत आहे. एकीकडे निष्ठेची भाषा  तर दुसरीकडे सत्तेची ओढ दोन टोकांमध्ये अडकलेले तनपुरे आता कोणता मार्ग निवडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

COMMENTS