जामखेड : पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्याचे मुख्यालय आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामखेड शहराचे नामक

जामखेड : पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्याचे मुख्यालय आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामखेड शहराचे नामकरण ‘अहिल्याधाम’, ‘अहिल्यातीर्थ’ किंवा ‘अहिल्याग्राम’ करण्यात यावे, अशी मागणी ‘जन जागरण युवा मंच’चे संस्थापक डॉ. भास्कर मोरे यांनी तहसीलदार धनंजय बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चौंडी या पवित्र भूमीशी नाते सांगणाऱ्या या तालुक्याच्या मुख्य शहराला अहिल्यादेवींचे नाव मिळाल्यास शहराच्या वैभवात आणि ऐतिहासिक ओळखीत मोठी भर पडेल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या अफाट कार्यातून समाजसेवा, धर्मकार्य, न्यायप्रियता आणि लोककल्याणाची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला मिळाली आहे. त्यांचे जन्मगाव याच तालुक्यातील चौंडी असल्याने, जामखेड परिसराला त्यांचा मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. त्यामुळे या महान व्यक्तिमत्त्वाच्या कायमस्वरूपी स्मृती जतन करण्यासाठी आणि भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी जामखेड शहराचे नाव बदलून ‘अहिल्याधाम’, ‘अहिल्यातीर्थ’ अथवा ‘अहिल्याग्राम’ यांपैकी एका योग्य नावाची घोषणा शासनाने करावी, अशी मागणी डॉ. मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा. राम शिंदे. आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना पाठवल्या आहेत. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.हर्षल डोके. सागर मोरे, हर्षद वाळुंजकर. आर. डी. काळे, सुमित बोरा, कल्पेश गायकवाड ,साहिल मुजावर, साहिम सय्यद, शहा मुक्तार, फरहान शेख, महेश मोरे, शौकत पठाण, मोहिद्दीन शेख, ढवळे, आयुब पठाण, आशिर पठाण, फैय्याज पठाण उपस्थित होते.

COMMENTS