मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालधक्क्यावरील ठेकेदारांकडून जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल ; माथाडी कामगारांचा दावा, समक्ष पाहणीचे केले आवाहन

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणारे माथाडी कामगार संथगतीने काम करतात, असा आरोप करणार्‍या ठेकेदारांकडून (हुंडेकरी) जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्तांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा रेल्वे मालधक्क्यावर हमाली काम करणार्‍या कामगारांनी केला आहे.

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या
राज्यात 2 ऑक्टोबरला ग्रामसभा होणार नाहीत, ग्रामसेवक युनियनची भूमिका
कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी द्या आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी-कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणारे माथाडी कामगार संथगतीने काम करतात, असा आरोप करणार्‍या ठेकेदारांकडून (हुंडेकरी) जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्तांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा रेल्वे मालधक्क्यावर हमाली काम करणार्‍या कामगारांनी केला आहे. जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्तांनी रेल्वे मालधक्क्यावर भेट देऊन समक्ष पाहणी करण्याचे आवाहनही या कामगारांनी केले आहे. 

रेल्वे मालधक्क्यावरील हमाल संथगतीने काम करतात, व त्यामुळे नियोजित वेळेत काम होत नसल्याने ठेकेदारांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते, असा दावा करून कामगारांच्या कामाला शिस्त लावण्याची मागणी काही ठेकेदारांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. यावर कामगारांकडून त्यांची बाजू मांडण्यात आली असून, त्यात ठेकेदारांकडून होत असलेल्या पिळवणुकीची तक्रारही केली गेली आहे. या कामगारांनी बाजू मांडताना सांगितलेे की, जागतिक कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकजण आपले काम इमानेइतबारे करीत आहेत. त्यांच्यासारखेच अत्यावश्यक सेवेत काम करणारे माथाडी कामगार कोरोना योद्धे म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. विविध क्षेत्रात काम करणार्‍यांना सुरक्षा कवच आहे. मात्र, रेल्वे मालधक्क्यावर काम करणार्‍या माथाडी कामगारांना कुठलेही सुरक्षा कवच नाही. ठेकेदार (हुंडेकरी) यांच्याकडून माथाडी कामगारांबाबत प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपले कर्तव्य (काम) प्रामाणिकपणे करणार्‍या कष्टकरी, गोरगरीब माथाडी कामगारांना कोणीही वाली राहिलेला नाही. गहू, खत व सिमेंटच्या गाडयांतील मालाची चढ-उतार करण्याचे काम आम्ही करतो. आम्हाला कोरोना सुरक्षा कवच मिळावे, तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची आमची मागणी आहे, असे विलास उबाळे यांनी सांगितले.

आमची बदनामी केली गेलीसिमेंट गोण्या वाहण्याचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत नाही. मात्र, हुंडेकरी यांच्या आग्रहाखातर त्यांचे काम करीत आहोत. कामगार लोकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप हुंडेकरी विनाकारण हेतूपुरस्सर करतात. हे सर्व आरोप निराधार आहेत व येथे भेट दिल्यावर सत्य परिस्थितीची जाणीव होईल, असा दावा करून पुढे म्हटले आहे की, आमचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने कोरोनाचा काळ असून देखील आम्ही काम चोखपणे करीत आहोत. कामासंदर्भात काही अडचणी असल्यास माथाडी कामगार, सहाय्यक कामगार आयुक्त व हुंडेकरी (ठेकेदार) यांच्यात वेळोवेळी चर्चा होते. या ठिकाणी हुंडेकरी नेहमीच खोटेनाटे आरोप करतात. अधिकार्‍यांची दिशाभूल करून त्यांना चुकीची माहिती दिली जाते. माथाडी कामगारांना बदनाम करण्याचे काम हुंडेकरी करीत आहेत. त्यांचे आरोप निराधार व खोटे आहेत व याचा आम्ही सर्व माथाडी कामगार निषेध करतो. आम्ही कधीही कामात चालढकल केली नाही, असा दावाही उबाळे यांनी केला. यावेळी माथाडी कामगार उपस्थित होते.

COMMENTS