Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईबाबा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया ; महिलेला नवजीवन

शिर्डी : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे ३२ सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे १५ किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जळगाव येथील मायाबाई राठोड (वय ४६) या गेल्या तीन वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली. जनरल सर्जन डॉ. रणजीत भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. रणजीत भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

बीड जिल्ह्यात 1773 रुग्णांना सुमारे 13.69 कोटीची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
बुलडाणा जिल्ह्यात 901 रुग्णांना सुमारे 07.11 कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत; सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे : मंत्री आबिटकर

शिर्डी : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल येथे जनरल सर्जरी विभागात अत्यंत जटिल व धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे ३२ सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे १५ किलो वजनाची पोटातील गाठ रुग्णाच्या शरीरातून सुरक्षितपणे काढण्यात आली. सध्या रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

जळगाव येथील मायाबाई राठोड (वय ४६) या गेल्या तीन वर्षांपासून पोटाच्या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्यांनी शिर्डी येथे उपचारासाठी धाव घेतली. जनरल सर्जन डॉ. रणजीत भोजने यांनी तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

डॉ. रणजीत भोजने यांच्या नेतृत्वाखाली तसेच भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जनरल ओटी विभागातील विद्या कदम, निलेश रावस, शहनाज पठाण, योगिता डालोरे, बाळासाहेब मोगल, गौतम मोकळ, रवी निर्मळ, बाळू डांगे या प्रशिक्षित वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या अचूक नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली.

सदर शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

COMMENTS