Homeताज्या बातम्या

तहसील कार्यालयात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी

 शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तहसीलस्तरीय लोकशाही दिन नियमितपणे

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीस चालना
पारनेरमध्ये कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
देवळाली प्रवरेहून पंढरपूरकडे सायकल वारी रवाना २५ सायकलपटूंचा सहभाग; १२ जुलै रोजी पंढरपुरात सायकल संमेलन
The meeting of sugar factory representatives was fruitless due to the  indifference of the taluka administration, Shevgaon Tehsil did not even  invite the factory owners to the meeting.

 शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयात शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा तहसीलस्तरीय लोकशाही दिन नियमितपणे घेण्यात यावा, अशी मागणी महात्मा गांधी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय एस. राजेभोसले यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. मात्र, शेवगाव तहसील कार्यालयात हा उपक्रम नियमितपणे राबविला जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.तसेच, ३० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला होता. त्याबाबत संबंधित विभागांना १५ दिवसांपूर्वी नोटीस देण्याची तरतूद असतानाही त्याचे पालन झाले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसून नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.लोकशाही दिनाची व्यापक प्रसिद्धी करून तो शासनाच्या नियमांनुसार नियमितपणे आयोजित करावा आणि नागरिकांच्या तक्रारींचे पारदर्शक व वेळेत निवारण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी (नगर परिषद) आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

COMMENTS