Homeताज्या बातम्या

पारनेरमध्ये कामगारांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पारनेर : असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन गरजांना आधार देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राणी निलेश लंके यांच्या हस्ते १५० असंघटित बांधकाम कामगारांना विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कष्टकरी वर्गाच्या कल्याणासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांपैकी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. लाभार्थी कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन अधिकाधिक पात्र कामगारांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ पोहोचविण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन जीवनाला हातभार लागावा, या उद्देशाने साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी बोलताना राणी  लंके म्हणाल्या, देशाच्या विकासात बांधकाम कामगारांचे योगदान अनन्यसाधारण आहे. उन्हा-पावसाची पर्वा न करता हे कामगार विकासाची पायाभरणी करतात. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या योजना आणि सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. कष्टकऱ्यांच्या पाठीशी लंके परिवार नेहमीच उभा राहिला आहे. कोणताही पात्र कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी पुढील काळातही सातत्याने प्रयत्न केले जातील.खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि कष्टकरी कामगारांसाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याण अशा विविध क्षेत्रांत लोकांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असून, साहित्य वाटपाचा हा उपक्रम त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणीचे महत्त्व, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अधिकाधिक कामगारांनी नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधकाम कामगार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत अशा लोकाभिमुख उपक्रमांचे स्वागत केले.

खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली
परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
दफनविधीनंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला !व्हॉट्सॲपवरील फोटोने उलगडले रहस्य;  प्रशासनापुढे पेच

COMMENTS