Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपुरस्कृत आवास योजनेत जामखेड अव्वल

जामखेड ः अमृतमहा आवास अभियान 3.0 स्पर्धेचा निकाल नूकताच जाहीर झाला असून  जामखेड पंचायत समितीने राज्यपुरस्कृत आवास योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रम

Ahmednagar : पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे दाखल | LOKNews24
गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू
उंदिरगाव-माळेवाडी ते श्रीक्षेत्र सराला बेट रस्त्याचे कामासंदर्भात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रास्तारोको

जामखेड ः अमृतमहा आवास अभियान 3.0 स्पर्धेचा निकाल नूकताच जाहीर झाला असून  जामखेड पंचायत समितीने राज्यपुरस्कृत आवास योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मागील दोन वर्षांपासून जामखेड पंचायत समितीने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतल्याचे पाहायला मिळते. गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी विविध उपक्रम राबवून जामखेड तालुक्यातील घरे वेळेवर पूर्ण होतील याकडे सातत्याने लक्ष दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या सर्वच कर्मचार्‍यांनी अतिशय मेहनत घेऊन 97 टक्के घरे पूर्ण केली. याचे फलित म्हणून अमृत महाआवास अभियान 3.0 स्पर्धेमध्ये जामखेड पंचायत समितीने राज्य पुरस्कृत आवाज योजनेत नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आरणगाव ग्रामपंचायतने राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यशाचे श्रेय निरनिराळ्या आघाड्यांना..! – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी यशाचे श्रेय देताना केवळ स्वतः पूरते सिमित न ठेवता लोकप्रतिनिधी,वरिष्ठ अधिकारी, विविध आघाड्यांवर काम करणार्‍या मंडळीं बद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. या यशात जामखेड तालुक्यातील पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. कधी झाली नव्हती एवढी जाणीव जागृती पत्रकार बंधूनी केली. काही गावात वर्तमानपत्रातील बातम्यांचे फ्लेक्स लागले. हे महाराष्ट्रात फक्त जामखेडमध्ये घडले असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

COMMENTS