Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेच्या प्रश्नावर सभापती सदिच्छा सोनी क्शन मोडवर; महावितरणच्या अभियंत्याला जाब विचारला

नांदेड : शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अखंडित वीजपुरवठ्याची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये वार

खामगावचे तापमान गेले 45 अंश सेल्सियसवर
सत्तेसाठी एकत्र, श्रेयासाठी आमनेसामने; 33 केव्ही उपकेंद्रावरून भाजपा-शिवसेना संघर्ष
‘वेट-बल्ब’ तापमानाचा भारताला महाभयंकर इशारा! २ तास घराबाहेर राहिल्यास जिवंत राहणे कठीण!

नांदेड : शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अखंडित वीजपुरवठ्याची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून महिला बालकल्याण व शिक्षण समितीच्या सभापती तथा नगरसेविका सदिच्छा सोनी-पाटील यांनी थेट महावितरण कार्यालयात धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला.
प्रभागातील विष्णुनगर, हमालपुरा, दयानंदनगर, नवा मोंढा, वसंतनगर, मगनपुरा, बाबानगर, शाहूनगर, खोब्रागडे नगर एक व दोन तसेच दलित वस्ती परिसरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवस असो वा रात्र, सतत होणार्‍या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्रभर झोप मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या भागात कोचिंग क्लासेस, विद्यार्थी वसतिगृहे आणि अभ्यासिका मोठ्या प्रमाणावर असल्याने परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्याने अभ्यासात व्यत्यय, इंटरनेट सेवा खंडित होणे आणि ऑनलाईन तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सदिच्छा सोनी-पाटील यांनी कार्यकर्त्यांसह महावितरणच्या अण्णाभाऊ साठे चौक येथील कार्यालयात भेट देत अभियंता घनबहादूर यांच्याशी थेट चर्चा केली. नागरिकांच्या तक्रारींचा पाढा वाचत त्यांनी महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना त्रास होणार असेल तर प्रशासन गप्प बसून चालणार नाही, असा कठोर संदेश त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी वैजू सोनी, जसवीरसिंग बेदी, संजय ठाकूर, भास्कर शिंदे, संभाजी साखरे, कामाजी सरोदे, रवी गारोळे, किशोर बोंढारे, साईनाथ रेड्डी, आकाश रेड्डी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांनुसार ट्रान्सफॉर्मरवरील वाढता ताण, किरकोळ बिघाड, दुरुस्तीतील ढिसाळपणा आणि नियोजनशून्य यंत्रणा यामुळे हा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी जीर्ण खांब, लोंबकळणार्‍या तारा आणि स्पार्किंगमुळे दुर्घटनेची शक्यता वाढली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. महावितरणच्या अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना करून पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, निकामी ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून नियमित वीजपुरवठा द्यावा, अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सदिच्छा सोनी-पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS