Homeताज्या बातम्या

नायगावात धाडसी घरफोडी; देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपासश्‍वानपथकाची मदत; वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड : नायगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात पुन्हा एकदा धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल 9 लाख 70 हजार रु

गेवराई पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, 12 जण ताब्यात, 6.63 लाखांचा मुद्देमाल जप्त
अल्पवयीन मुलास मारहाण  
भिवंडीत सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
Nanded Burglary |नायगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; शिवगंगा सोसायटीतील दोन घरे  फोडून दागिने, रोकड लंपास


नांदेड : नायगाव शहरातील व्यंकटेश नगर परिसरात पुन्हा एकदा धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही रक्कम प्लॉट खरेदीसाठी जमा करून घरात ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहरातील वाढत्या घरफोड्यांबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले माधव कोटकर हे आपल्या कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. 28 जूनच्या रात्री उशिरा ते घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घराची पाहणी केली असता कपाटातील 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सदरची रोकड त्यांनी प्लॉट खरेदीच्या व्यवहारासाठी जमा करून सुरक्षितपणे घरात ठेवली होती. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश केला आणि थेट कपाटातील रोकडवर हात साफ केला. चोरीनंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच माधव कोटकर यांनी तात्काळ नायगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, नायगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे रात्रीची पोलिस गस्त वाढवून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या धाडसी चोरीमुळे नायगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा अथवा रात्री घरफोड्या होत असल्याने नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली असून, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS