बीड : पाडळी येथील भिल्ल समाजातील शंकर बरडे यांच्या गाजलेल्या खून प्रकरणात बीड न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील

बीड : पाडळी येथील भिल्ल समाजातील शंकर बरडे यांच्या गाजलेल्या खून प्रकरणात बीड न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले असून, यामुळे आरोपींना मोठा धक्का बसला आहे, तर मृत शंकर बरडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
या प्रकरणातील सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. सूर्यकांत पवार यांनी अत्यंत प्रभावी आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद सादर केला. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, तपासादरम्यान समोर आलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची दाट शक्यता आणि आरोपींना जामीन मंजूर झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर होणारा परिणाम या सर्व बाबी त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. अॅड. पवार यांच्या मुद्देसूद मांडणीची दखल घेत न्यायालयाने आरोपी नाना जानू सरवदे, अंकुश गिरजाप्पा अवंतकर, अक्षय राजाभाऊ सरवदे, सोनाजी भिवसेन सरवदे आणि अशोक (पिनू) सखाराम सरवदे या पाचही जणांचे जामीन अर्ज नामंजूर केले.
पाडळी खून प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले असताना न्यायालयाच्या या कठोर भूमिकेचे भिल्ल समाज आणि परिसरातून मोठे स्वागत करण्यात येत आहे. या प्रकरणात फिर्यादी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अॅड. सूर्यकांत पवार यांना अॅड. शेख इम्रान, अॅड. पंकज रायभोळे, अॅड. शेख अनवर तसेच इबात शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS