Homeताज्या बातम्या

CJP दिल्ली आंदोलनावर चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान; “दगडांवरील फिंगरप्रिंट्सवरून आधार लिंक करत आरोपींचा शोध!”

दिल्ली/मुंबई: CJP (सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस) चे आंदोलन संपल्यानंतर आता आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर वेगवेगळ्या राज्यांत कारवाई केली जात असल्य

दुर्गम काचरवाडीच्या ऊसतोड कामगार कुटुंबातील ज्ञानेश्वरची ‘नीट’मध्ये घवघवीत कामगिरी; ५९० गुण मिळवत मिळवले उल्लेखनीय यश
विदर्भात पावसाचा धुमाकूळ! गडचिरोली आणि मेळघाटात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला; गोंदियात चक्रीवादळाचे थैमान
सौ. के. एस. के. (काकू) महाविद्यालयात विद्यार्थी संसद २०२६-२७ स्थापन; नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन
Black ink thrown on Chandrakant Patil

दिल्ली/मुंबई: CJP (सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस) चे आंदोलन संपल्यानंतर आता आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांवर वेगवेगळ्या राज्यांत कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप सीजेपीने केला आहे. “आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही,” असे दिलेले आश्वासन केंद्र सरकार मोडत असल्याचा दावा करत सीजेपीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाराच्या रिपोर्टचा आधार घेत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी सापडणाऱ्या वस्तू आणि दगडांवरील फिंगरप्रिंट्स घेऊन त्याद्वारे आंदोलनातील मोठ्या आरोपींचा शोध घेत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

“तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ले करण्याचे आदेश गृह मंत्र्यांचेच होते, असा दावा केला आहे. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकशाहीत कोणीही आरोप करू शकतो, हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. मात्र आरोप केला म्हणजे तो खरा असतो असे नाही. मी काल एका पत्रकाराचा व्हिडियाे पाहिला, तो रिपोर्ट पाहून चक्करच येईल. त्या आंदोलनात किती लोक होते आणि त्यातील कोण-कोण किती गुन्ह्यांत सहभागी होते, याचे विश्लेषण पोलिसांनी केले आहे.”

गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध

तपासाबाबत अधिक बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणचा अगदी छोटासा दगडही पुरावा म्हणून जमा केला आहे. त्या दगडावर बोटांचे साधे ठसे असले, तरी ते तंत्रज्ञानाच्या मदतीने आधार कार्ड डेटाशी लिंक होणार आहेत. गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले किती आरोपी त्या आंदोलनात उपस्थित होते, याचा तपास या आधारे केला जात आहे. हा दावा मी स्वतः करत नसून एका पत्रकाराच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.”

राहुल गांधींनी पुरावे द्यावेत

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “एकीकडे राहुल गांधी केवळ आरोप करत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्या आंदोलनात परदेशी नागरिक किती होते, याची आकडेवारीच समोर आणली आहे. आता पोलिसांना त्यांचा दावा सिद्ध करावा लागेल आणि राहुल गांधींनाही त्यांनी केलेल्या आरोपांचे सत्य पुरावे द्यावे लागतील.”

COMMENTS