Homeताज्या बातम्या

संत गोरोबाकाका महिला बचत गटातर्फे सेवानिवृत्तीबद्दल पोलीस उपनिरीक्षक गणपतराव शेवाळकर यांचा सत्कार

नांदेड पोलीस दलात तब्बल 36 वर्षे अत्यंत कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणे आणि अहोरात्र सेवा बजावणारे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय)

हद्दपार गुन्हेगारांचे जामखेडमध्ये वास्तव्य; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद; गुन्हा दाखल
गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी
शेतकर्‍यांची मोटार व वायर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; शेतकर्‍यांना दिलासा


नांदेड पोलीस दलात तब्बल 36 वर्षे अत्यंत कर्तव्यनिष्ठेने, प्रामाणिकपणे आणि अहोरात्र सेवा बजावणारे भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) गणपतराव लक्ष्मणराव शेवाळकर हे 30 जून 2026 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवापूर्तीनिमित्त नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ’हार्दिक सेवानिवृत्ती सन्मान सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
गणपतराव शेवाळकर यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची पावती म्हणून त्यांना त्यांच्या सेवाकाळात तब्बल 151 बक्षीसे व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार त्यांच्या कठोर मेहनत, समर्पण आणि असीम कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी आणि शाखांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. यामध्ये पोलीस स्टेशन किनवट, माहूर, मनाठा, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, आणि भाग्यनगर या पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), जिल्हा विशेष शाखा (डीएसबी), पोलीस मुख्यालय आणि एच.एस.पी. बारड (एचएसपी बारड) यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विभागांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवला. दि. 30 जून रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून शेवाळकर यांच्या सेवेचा गौरव केला व त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, संत गोरोबाकाका महिला बचत गटाचे अध्यक्ष प्रतिनिधी रमेश देवडे, सचिव प्रतिनिधी हनुमंत रावणपल्ले, नागनाथ कानगुलवार रमेश नामपल्ले,आत्माराम रावण पल्ले व मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला. त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे जीवन सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे जावो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS