Homeताज्या बातम्या

रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार; बीडच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांच्या वतीने त्यांचा विशेष स

पारनेर तालुका रिपब्लिकन सेना अध्यक्षपदी भालेराव
न्याय मिळेपर्यंत आंबेडकर घराणे दळवी कुटुंबाच्या पाठीशी; आनंदराज आंबेडकर यांचा शब्द
ऐक्याचा एल्गार: आरक्षण उपवर्गीकरणाच्या डावाविरोधात किनवटमध्ये वज्रमूठ! बैठकीचे आयोजन

बीड : रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमादरम्यान आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष सुशील सूर्यवंशी, भूषण लोळगे तसेच लक्ष्मण गव्हाणे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांचा पुष्पहार, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा गौरव केला. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत वक्त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS