Homeताज्या बातम्या

गोदापात्रात अवैध वाळू उपशावर धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हे, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव: तालुक्यातील वेळापूर गावच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत १८ लाख

व्यवस्थेचा मांडलेला बाजार! शिक्षक पात्रता चाचणी पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार
मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट

कोपरगाव: तालुक्यातील वेळापूर गावच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काही आरोपी फरार आहेत.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, देर्डे चांदवड शिवार व वेळापूर परिसरातील गोदावरी नदीपात्रातून डंपर तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोपरगाव तालुका पोलिसांच्या पथकाने प्रथम देर्डे चांदवड येथे कारवाई करून एक डंपर ताब्यात घेतला. त्यानंतर वेळापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता काही जण ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून चौकशी केली असता आरोपींची नावे विकास बाळासाहेब आरणे (रा. दहेगाव, ता. राहाता), यश दत्तात्रय कोते (रा. विट्टलवाडी, शिर्डी), सर्जन मेहेरखांब (रा. कोपरगाव), राहुल चांगदेव पगारे (रा. वेळापूर, ता. कोपरगाव) आणि सोमेश्वर गोरख शिंदे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव) अशी निष्पन्न झाली. यापैकी काही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाई दरम्यान एक डंपर व दोन ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

COMMENTS