Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भायगावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

भातकुडगाव फाटा : शेवगाव -नेवासा मार्गावरील भायगाव येथील ग्रामदैवत श्री नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला ५८ वर्षांची परंपरा लाभली असून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. वै. बन्सी महाराज तांबे व वै. पांडुरंग महाराज वैद्य यांच्या आशीर्वादाने तसेच वै. नामदेव पाटील लांडे यांनी सुरू केलेल्या या सप्ताहाला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा येथील महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांची प्रेरणा लाभत आहे. सप्ताह काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुभाष महाराज भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा रंगणार आहे. यामध्ये गहिनीनाथ महाराज आढाव, अविनाश महाराज लोखंडे, जगन्नाथ महाराज शास्त्री (जगदंब माता गड, कारेगाव), बाबागिरी महाराज (काशी केदारेश्वर संस्थान, नागलवाडी), भगवंत महाराज मुळे (गोंदीकर), भागीरथी बाबा (श्री क्षेत्र फुंदे टाकळी), देविदास महाराज म्हस्के शास्त्री (नेवासा संस्थान) तसेच रामायणाचार्य हनुमंत महाराज (वैष्णव सेवा आश्रम, बऱ्हाणपूर) यांचा समावेश आहे. याशिवाय भायगाव व परिसरातील विष्णू महाराज दुकळे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, सुभाष महाराज मोरे, प्रतिभा महाराज शेळके यांच्यासह अनेक गायक व भजनी मंडळे सप्ताहात सहभाग घेणार आहेत. सप्ताहादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालक, मॅनेजर व ग्राहकांसह १० जणांवर गुन्हा दाखल
श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी
माका येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. गायकवाड रुजू
Oplus_131072

भातकुडगाव फाटा : शेवगाव -नेवासा मार्गावरील भायगाव येथील ग्रामदैवत श्री नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला ५८ वर्षांची परंपरा लाभली असून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

वै. बन्सी महाराज तांबे व वै. पांडुरंग महाराज वैद्य यांच्या आशीर्वादाने तसेच वै. नामदेव पाटील लांडे यांनी सुरू केलेल्या या सप्ताहाला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा येथील महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांची प्रेरणा लाभत आहे.

सप्ताह काळात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुभाष महाराज भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा रंगणार आहे. यामध्ये गहिनीनाथ महाराज आढाव, अविनाश महाराज लोखंडे, जगन्नाथ महाराज शास्त्री (जगदंब माता गड, कारेगाव), बाबागिरी महाराज (काशी केदारेश्वर संस्थान, नागलवाडी), भगवंत महाराज मुळे (गोंदीकर), भागीरथी बाबा (श्री क्षेत्र फुंदे टाकळी), देविदास महाराज म्हस्के शास्त्री (नेवासा संस्थान) तसेच रामायणाचार्य हनुमंत महाराज (वैष्णव सेवा आश्रम, बऱ्हाणपूर) यांचा समावेश आहे.

याशिवाय भायगाव व परिसरातील विष्णू महाराज दुकळे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, मल्हारी महाराज परभणे, सुभाष महाराज मोरे, प्रतिभा महाराज शेळके यांच्यासह अनेक गायक व भजनी मंडळे सप्ताहात सहभाग घेणार आहेत.

सप्ताहादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS