वाझेंकडील पाच बॅगात काय दडले? ;  बनावट आधारकार्डाच्या आधारे ट्रायडंटमध्ये मुक्काम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाझेंकडील पाच बॅगात काय दडले? ; बनावट आधारकार्डाच्या आधारे ट्रायडंटमध्ये मुक्काम

अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू असलेले गुप्तवार्ता विभागाचे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत.

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार | LOK News 24
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला लागणार सुरूंग
पंतप्रधानांना इतर देशातील युद्धांमध्ये रस l LokNews24

मुंबई/प्रतिनिधी: अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू असलेले गुप्तवार्ता विभागाचे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. पाच बॅगा, पैसे मोजण्याचे मशीन आणि त्यासोबतची महिला यातील संबंधाचा एनआयए शोध घेत आहे. 

ट्रायडंट हॉटेलमध्ये वाझे बनावट आधार कार्डाच्या आधारे राहिले असे आता उघडकीस आले आहे. त्यांच्यासोबत एक महिला दिसून आली होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते. त्यामुळे ही महिला कोण, याचा तपास सध्या एनआयए करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील खोलीची झडती घेतली. याठिकाणी एनआयएच्या अधिकार्‍यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर एनआयएो अधिकारी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन परतले होते.या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. वाझे हे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर 24 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण कट ट्रायडंट हॉटेलमध्येच शिजला का, याचा तपास एनआयएकडून सुरू आहे. वाझे यांनी बोगस आधारकार्ड दाखवून ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळी त्यांच्याकडे पाच बॅगा होत्या. यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचा एनआयएला संशय आहे. तसेच त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे यंत्र होते. त्यामुळे ही महिलाही या कटात सहभागी होती का, याचा शोध एनआयए घेत आहे.सध्या एनआयए वाझे यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून प्रश्‍न विचारत आहे. पाचपैकी कोणत्या बॅगेत जिलेटीन होते, सोबतची महिला कोण होती, याबाबत वाझे यांना प्रश्‍न विचारले जात असल्याचे समजते. वाझे यांचे बनावट आधारकार्ड मिळाले आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाझे हे याच बनावटआधार कार्डचा वापर करत असल्याचे बोलले जात आहे. वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर वाढदिवसाची तारीखही लिहिण्यात आली आहे.

हप्ते वसुलीची डायरी हाती?

वाझे यांच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती वाझे यांची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचे, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपिते उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले, त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

COMMENTS