कोरपगाव : श्री स्वामी समर्थ मंदिर, सुभद्रानगर येथे सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्य

कोरपगाव : श्री स्वामी समर्थ मंदिर, सुभद्रानगर येथे सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास युवानेते विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, नगराध्यक्ष पराग संधान व नगरसेवकांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी काळे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण करून कामाला विरोध दर्शविला असल्याचे कोल्हे गटातील कार्यकर्त्यांनी सांगतिले.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या सभामंडप बांधकामामुळे मंदिर परिसरात भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आणि सामाजिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा निर्माण होणार आहे; मात्र काळे गटाला यात राजकारण करण्यात जास्त रस होता असेच यावरून स्पष्ट झाले कारण याच कामाचे श्रेय घेण्यासाठी आधी फलकबाजी केली आणि नंतर स्वतःच विरोध केला यावरून दुतोंडी भूमिका काळे यांची आहे असा जोरदार हल्लाबोल कोल्हे गटाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पूर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत सुमारे ३७ लाख ७२ हजार रुपयांच्या निधीतून सांस्कृतिक भवन उभारणीचे हे काम हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सुभद्रानगर परिसराच्या विकासाला नवे बळ मिळणार असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहे. हा निधी कुणाचेही श्रेय नसून खऱ्या अर्थाने नागरिकांचा अधिकार असणारा निधी आहे त्यामुळे याचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी मत व्यक्त केले आहे.
उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, बांधकाम सभापती निलोफरभाभी पठाण, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, रवींद्र नरोडे,प्रसाद आढाव,विजय वाजे, वैभव गिरमे, योगेश बागुल, हरिभाऊ गिरमे, राजेंद्र सालकर, यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

COMMENTS