Homeताज्या बातम्या

नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन

मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गळती आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्

काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात
अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; सांगलीतील धक्कादायक घटना, संशयित पत्नी व प्रियकर ताब्यात
छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’ एफडीएकडून सील; अस्वच्छता आणि गंभीर त्रुटींमुळे परवाना निलंबित
Uddhav Thackeray Raj Thackeray Joint Press Conference at Shiv Tirtha

मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET) कथित प्रश्नपत्रिका गळती आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत दोन्ही नेत्यांनी २६ जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्च्यात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

राज ठाकरे यांनी देशभरातील विद्यार्थी आंदोलन शांततापूर्ण असल्याचा दावा करत आंदोलन दडपण्यासाठी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला. या घटनांमुळे देशभरात तसेच महाराष्ट्रात संतापाची भावना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही विभागात गंभीर त्रुटी आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित मंत्र्यांनी स्वीकारणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांची सुरुवातीची मागणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरती मर्यादित होती; मात्र आंदोलकांवरील कारवाईनंतर हा विषय अधिक व्यापक झाला. सरकारने विद्यार्थ्यांशी सुरुवातीलाच चर्चा केली असती, तर परिस्थिती एवढी चिघळली नसती. संवाद साधण्याऐवजी दडपशाहीची भूमिका घेतली जात असून, केंद्रित प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे यांनी हा संघर्ष केवळ प्रवेश परीक्षापुरता मर्यादित नसून विविध प्रश्नांमुळे जनतेत निर्माण झालेल्या असंतोषाचे प्रतीक असल्याचे सांगितले. देशातील विविध राज्यांतील नागरिकांशी संवाद साधताना लोकांमध्ये तीव्र नाराजी वाढल्याचे जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले.

शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक निघणार मोर्चा

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी २६ जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. हा मोर्चा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांच्या भावना व्यक्त करणारा शांततापूर्ण निषेध असेल. हा मोर्चा पूर्णपणे शांततामय पद्धतीने पार पाडला जाईल आणि आंदोलनाला कोणतेही वेगळे वळण लागू नये यासाठी सहभागी नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.

COMMENTS