Homeताज्या बातम्या

घरांच्या किंमतीत मुंबईत २० टक्के, तर पुण्यात ११ टक्के वाढ; विक्री आणि नव्या पुरवठ्यात मात्र घट

पुणे : देशातील घरांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून, सरासरी किंमती पहिल्यांदाच प्रतिचौकरस फूट १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षाच्य

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण; पालिका आयुक्तांचे पोलिसांना कारवाईचे निर्देश
अमृता खानविलकरला ‘नटरंग कलागौरव पुरस्कार’; २९ मे रोजी पुण्यात होणार वितरण
मोफत गणवेश योजनेत महत्त्वपूर्ण बदल; १०० टक्के पॉलिस्टर कापडावर बंदी
Odisha Govt To Launch Affordable Housing Project In Bhubaneswar |  OdishaBytes

पुणे : देशातील घरांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून, सरासरी किंमती पहिल्यांदाच प्रतिचौकरस फूट १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरांच्या किंमतीत मुंबईत २० टक्के, तर पुण्यात ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या किंमती वाढत असतानाच नवीन घरांचा पुरवठा आणि विक्रीमध्ये मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे.

‘प्रॉपटायगर’ (PropTiger) संस्थेने देशातील आठ प्रमुख शहरांमधील स्थावर मालमत्ता (Real Estate) क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशात घरांच्या सरासरी किंमती प्रतिचौकरस फूट १०,०५० रुपयांवर गेल्या आहेत.

प्रमुख शहरांमधील घरांच्या सरासरी किंमती (प्रतिचौकरस फूट):

  • मुंबई: १५,१२० रुपये (सर्वाधिक वाढ – २०%)
  • बंगळुरू: ९,७८५ रुपये (सर्वाधिक वाढ – २४%)
  • दिल्ली: ९,५३४ रुपये
  • हैदराबाद: ८,२४० रुपये
  • पुणे: ७,९५७ रुपये
  • कोलकाता: ६,२२२ रुपये
  • अहमदाबाद: ४,९४९ रुपये

विक्री आणि नव्या पुरवठ्याची स्थिती:

यंदाच्या पहिल्या तिमाहीत प्रमुख महानगरांमध्ये एकूण ९५,९७३ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत ९८,०९५ घरांची विक्री झाली होती, म्हणजेच यंदा विक्रीत २.२ टक्के घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत मुंबईत सर्वाधिक २६,११६ घरांची विक्री झाली; तर बंगळुरूत १५,६०३, पुण्यात १३,५६५ आणि हैदराबादमध्ये १३,२९७ घरांची विक्री नोंदवली गेली.

नव्या घरांचा पुरवठा यंदा ९३,०६५ इतका असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ०.१ टक्के किरकोळ घट झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत मुंबईत घरांच्या विक्रीत १४.९ टक्के तर नवीन पुरवठ्यात १३.२ टक्के घट झाली आहे. याच काळात पुण्यात घरांच्या विक्रीत २१.३ टक्के घट, तर नवीन पुरवठ्यात १.५ टक्के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS