Homeताज्या बातम्या

राजमुद्रा असलेल्या व्हीआयपी वाहनांवर शिर्डीत कारवाई

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दोन आलिशान वाहनांवर अनधिकृतपणे राजमुद्रा आणि काळ्या काचा असल्याने शिर्डी वाहतूक पोलिसांनी रव

मधुमक्याची बाजारात आवक वाढली; भाव आटोक्यात आल्याने ग्राहकांची खरेदीला मोठी पसंती
श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश! दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी शहरातून भव्य शांतता रॅली
गणेश ढाकणे यांची औषध निरीक्षकपदी निवड! ११ वर्षांचे कठोर परिश्रम अन् जिद्दीला यश
Shirdi News: Luxury vehicles caused commotion in Shirdi police action those  who were flaunting their arrogance

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दोन आलिशान वाहनांवर अनधिकृतपणे राजमुद्रा आणि काळ्या काचा असल्याने शिर्डी वाहतूक पोलिसांनी रविवारी (२ ऑगस्ट) दंडात्मक कारवाई केली. नगर-मनमाड रोडवर ही वाहने उभी असल्याची माहिती जागरूक नागरिकांनी दिल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहने शिर्डी पोलीस ठाण्यात आणली. वाहनांची पाहणी केली असता त्यावर राजमुद्रा लावल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांच्या तपासणीत वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म (काळी फिल्म) लावलेली असणे, आरटीओच्या नियमानुसार नंबर प्लेट नसणे आणि काळी काच असल्याचा नियमभंग आढळून आला. यानंतर वाहनधारक साईभक्तांनी आपली चूक कबूल करत स्वतः राजमुद्रेचे स्टिकर काढून टाकले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ३५०० रुपयांचा दंड रोख स्वरूपात वसूल करण्यात आला. शिर्डीत दर्शनासाठी लाखो भाविक येतात, मात्र कोणालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही आणि अनधिकृत राजमुद्रा लावता येणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. वाहनधारक कोणीही असला तरी नियमांचे उल्लंघन केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक येसेकर यांनी दिला आहे.

COMMENTS