Homeताज्या बातम्यादेश

प.बंगालच्या माजी मंत्र्याला ईडीने केली अटक

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील महानगरपालिका भरती प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुजीत बोस यांना अंमलबजावणी संचालनालय अर्था

ममतांची कसोटी, तृणमूलमध्ये फूट !
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा
तृणमूल काँगे्रसच्या दोन खासदारांचे राजीनामे


कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील महानगरपालिका भरती प्रकरणात राज्याचे माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुजीत बोस यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. सोमवारी सकाळी ते आपल्या मुलगा समुद्र बोस यांच्यासह चौकशीसाठी कार्यालयात हजर झाले होते. सुमारे दहा तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आले.
2014 ते 2018 या कालावधीत दक्षिण दमदम महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य भरती करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या काळात सुमारे 150 जणांना बेकायदेशीररीत्या नोकर्‍या देण्यात आल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. या नियुक्त्यांच्या बदल्यात पैसे तसेच सदनिका स्वीकारल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्या काळात सुजित बोस हे दमदम नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. विधाननगर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेले सुजित बोस नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुखर्जी यांच्याकडून मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाकडून सुजित बोस यांना अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक नोटीस 6 एप्रिल रोजी देण्यात आली होती. याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याचे कारण देत त्यांनी यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौकशीसाठी हजर राहण्यापासून तात्पुरती सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. निवडणुका संपल्यानंतर 1 मे रोजी ते तपास अधिकार्‍यांसमोर हजर झाले. त्यानंतर अकरा दिवसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

COMMENTS