Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागसेन बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

बीड : नागसेन बुद्धविहार येथे आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व धम्ममय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उ

ढेकनमोहा येथे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन

बीड : नागसेन बुद्धविहार येथे आज बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व धम्ममय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व ध्वजवंदना घेण्यात आली. पुढे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अभिवादन करून बुद्ध वंदना करण्यात आली. या प्रसंगी उमाजी वाघमारे, काशीनाथ वाघमारे, केशरताई कांबळे, प्रा. व्ही. आर. गाडे, सुनिल कांबळे, एस. ए. सोनवणे आणि सरवदेताई यांनी बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व विशद केले. दरम्यान, आज वाढदिवस असलेले एस. ए. सोनवणे व आरुष सिरसठ यांचा नागसेन बुद्धविहाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शरणागत प्रार्थनेने सांगता करण्यात आली. उपस्थितांसाठी भोजनदान एस. ए. सोनवणे यांनी, खीरदान ए. एस. उजगरे (बापू) यांनी, तसेच अल्पोपहार (केळी) आरुष सिरसठ यांनी दिला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.

COMMENTS