ढेकणमोहा : बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभाव

ढेकणमोहा : बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व पंचशील ध्वजारोहणाने झाली.
युवा रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर दुपारी 4 वाजता पूज्य भिक्खू धमशिल थेरो (शिवणी) यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत सुमारे 70 भंतेजींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामुळे सारा परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीनंतर पूज्य भिक्खू धमशिल थेरो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी समता, बंधुता व शिक्षणाचा संदेश देत समाजाने या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. लहान मुलांच्या भाषणांचा कार्यक्रम पार पडला. बालकांनी बुद्ध व आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रभावी विचार मांडले. सायंकाळी साक्षी साळवे यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी पप्पु कागदे युवा प्रदेश अध्यक्ष रिपाइं, पु भिकुखु धमशिल थेरो, पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गर्जे, अरुण नाना डाके माजी सभापती, किशनराव तांगडे रिपाइं तालुका अध्यक्ष, महादेव दादा उजगरे वडवणी तालुका अध्यक्ष, शाहुराव डोळस रिपाइं जिल्हा अध्यक्ष दिव्याग, सुधीर काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, भगीरथ बांडे माजी सरपंच, बंडु नाना घूमरे सरपंच वलीपुर, वसंत गुंदेकर माजी सरपंच, विक्रम डोळस, बालापसाद जाजु चेअरमन, परमेश्वर थापडे उपसरपंच, भारत देवकाते शिवसेना उपतालुकाप्रमुख, नारायण देवकते ग्रामपंचायत सदस्य, शरद देवकते, सतिश शिनगारे, भिमराव घोडेराव, प्रा.आमीत सवाई, राहुल कोरडे, युवराज जाधव, बळीराम थापडे, गणेश प्रधान, संतोष देशमुख सर कपिल तांगडे, रुद्रा मिसळे, महादेव थापडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दिलीप शिंदे, नागेश शिंदे, नंदू शिंदे, अरविंद शिंदे, दयाराज शिंदे, सखाराम शिंदे, विनोद शिंदे, विकास शिंदे, बापू शिंदे, बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब डोंगरे ,विपिन शिंदे, महादेव शिंदे, अजय शिंदे, प्रकाश शिंदे, आनंद शिंदे, पोपट शिंदे, प्रभाकर शिंदे, दादा किसन शिंदे, बारीक शिंदे, वसंत शिंदे, कृष्णा शिंदे, समाधान शिंदे,कृष्णा ससाने, रमेश शिंदे, शहादेव शिंदे, विकी शिंदे, विश्वनाथ शिंदे, किसन शिंदे, राजेंद्र साळवे, दत्ता शिंदे, ऋषिकेश शिंदे, विश्वजीत शिंदे, अभिजीत शिंदे, रघुनाथ शिंदे, अरुण शिंदे पोपट शिंदे, भगवान शिंदे,राहुल शिंदे, आकाश शिंदे, युवराज गायकवाड, सुनील शिंदे , कृष्णा शिंदे, दिनेश पिसाळ, दिनकर येवले, चत्रभुज थापडे, डॉ.किशोर डोंगरे, संतोष ससाणे, रमेश जावळे, रमेश शिंदे, कचराप्पा शिंदे, नवनाथ शिंदे,धम्मानंद शिंदे,गोरख चौरे यांच्यासह जयंती उत्सव समितीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.

COMMENTS